Tuesday, 21 December 2010

श्री गणेशाय नमः

|| ||
चांगले संस्कार कुणाला नको असतात? खरे तर हिंदू कुटुंबांमध्ये संस्कारांची सुरुवात होते अगदी लहानपणीच - गोष्टी, गाणी यातून. अन पुढे ती सांस्कृतिक वीण अधिक घट्ट होत जाते ती श्लोक, स्त्रोत्रे आदींच्या पाठांमधून.
बदलत्या कालानुसार आपली कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, जीवनपद्धती असे सर्वच बदलत आहे आणि हे होणे साहजिकच आहे. एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य ठरत चाललेली आहे हे तर खरेच पण तिच्याबरोबरच मुलांना गाणी, गोष्टी सांगत, स्तोत्रे शिकवत, त्यांच्यावर संस्कार करणारे आजी आजोबा देखील दुर्मिळ होत जात आहेत.
 कश्यासाठी पोटासाठी याच्यापलीकडे आपण कधीच गेलो आहोत आणि दिवसाचे १६-१८ तास अर्थार्जन करणे खरेच गरजेचे झाले आहे. या दगदगीत, धावपळीत पूर्वी शिकलेली स्तोत्रे, श्लोक, परवचा, आरत्या, बालगीते, कविता, पाढे  वगैरेंची उजळणी करायला वेळ कुठे असतो? मग एखाद्या दिवशी एखादी आरती म्हणताना, स्तोत्र म्हणताना आपण अडतो अन तेव्हा लक्षात येतं, `अरे! सगळं लहानपणी शिकलेलो बरच काही आपण  विसरत चाललेलो आहोत.'
ही भावना मलादेखील नेहमी होते. असाच एकदा मायबोलीवर इथे स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह पहिला अन परत ही भावना उफाळून आली. तेव्हा मनात विचार आला, वेळ मिळेल तसतश्या शक्य तेव्हढ्या गोष्टी संकलित करून ठेवाव्यात. त्यानंतर परत विचार केला, जर हे संकलन करायचेच आहे तर ते अश्या प्रकारे करावे की जे लोकांना देखील उपलब्ध असेल आणि ज्यामध्ये इतर लोक देखील भर टाकू शकतील. म्हणून गागर में सागर भरण्याचा हा प्रयत्न.

No comments:

Post a Comment