Sunday, 26 December 2010

दैनंदिन प्रार्थना - २

सुर्य वंदना:
आदिदेव। नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर।
दिवाकर। नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुsते॥

सुर्यनमस्कार
ॐ मित्राय नमः
ॐ रवये नमः।
ॐ सूर्याय नमः।
ॐ भानवे नमः।
ॐ खगय नमः।
ॐ पुष्णे नमः।
ॐ हिरण्यगर्भाय नमः
ॐ मारिचाये नमः।
ॐ आदित्याय नमः।
ॐ सावित्रे नमः।
ॐ अर्काय नमः।
ॐ भास्कराय नमः।

सुर्यनमस्काराची फलश्रुती
आदितस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मजन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते॥

ब्रह्मतत्व प्रार्थना
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

दीर्घायुष्यासाठीची प्रार्थना
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:॥
स्थिरैरग्ङैस्तुष्टुवांसस्तनुभि:।
व्यशेम देवहितं यदायु:॥

कल्याण होण्यासाठीची प्रार्थना
स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा:।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदा:॥
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि:।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥

सरस्वतीची प्रार्थना
प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती।
धीनामवित्र्यवतु॥१॥
चोदयित्रि सूनृतानां चेतंती सुमतीनाम्।
यज्ञं दधे सरस्वती॥२॥
महो अर्णः सरस्वती प्रचेतयति केतुना।
धियो विश्वा विराजती॥३॥

आत्मउद्धारासाठीची प्रार्थना
असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्माsमृतं गमय।
ॐ शांति: शांति: शांति:॥

Friday, 24 December 2010

दैनंदिन प्रार्थना - १

सकाळी म्हणावयाचे श्लोक व प्रार्थना:

करदर्शनम् (उठल्या उठल्या हात पाहून म्हणावयाचा श्लोक)
कराग्रे वसते लक्ष्मी: करमुले सरस्वती।
करमध्ये तू गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।

पृथ्वीला वंदन (जमिनीवर पाय ठेवण्याआधी म्हणण्याचा श्लोक)
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।।

सुप्रभातीची प्रार्थना
ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरांतकारी
भानु: शशी भूमिसुतो बुधश्च।
गुरुश्च शुक्रः शनिराहुकेतवः
कुर्वन्तु सर्वे ममसुप्रभातम्॥

गुरुवंदना
गुरुर्बह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः॥

श्रीकृष्ण वंदना
वसुदेवसुतं देवं कंसचाणुरमर्दनम्।
देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥

माधव वंदना
मूकं करोती वाचालं पङगुं लंघयते गिरिम्।
यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवम्॥

देवी वंदना
नमो देव्यै महादैव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म् ताम्॥

दात घासताना करावयाची वनस्पतींची प्रार्थना
आयुर्बलं यशो वर्चः प्रजा: पशुन् वसूनि च।
बह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते॥

नामसंकीर्तन
पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः।
पुण्यश्लोका च वैदेही पुण्यश्लोको जनार्दनः॥

सप्तचिरंजीव स्मरण
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा:।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥

पंचकन्या स्मरण
अहल्या दौपदी सीता तारा मंदोदरी तथा।
पच्ञकं ना स्मरेनित्यं महापातकनाशनम्॥

सप्त मोक्षपुरी स्मरण
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका॥

नारायण वंदन
नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमंम्।
नृसिंहं नागनाथं च तं वंदे नरकान्तकम्॥

श्रीरामवंदन
राघवं रामचंद्रं च रावणारिं रमापतीम्।
राजीवलोचनं रामं तं वंदे रघुनन्दनम्॥

तुलसी वंदन
तुलसि श्रीसखि शिवे पापहारिणि पुण्यदे।
नमस्ते नारदनुते नमो नारायणप्रीये॥
सप्तनदी वंदन (स्नान करताना करावयाचे आवाहन)
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधु कावेरि जलेsस्मिन् सन्निधिं कुरु॥

मंगल कामना
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी सरयु महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी
पुर्णा: पुर्णजलै: समुद्रसहिता: कुर्वन्तु मे मंगलम्॥

गंगामातेला नमस्कार
नमामि गग्ङे। तव पादपंकजं
सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपम्।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं
भावानुसारेण सदा नराणाम्॥

Tuesday, 21 December 2010

श्री गणेशाय नमः

|| ||
चांगले संस्कार कुणाला नको असतात? खरे तर हिंदू कुटुंबांमध्ये संस्कारांची सुरुवात होते अगदी लहानपणीच - गोष्टी, गाणी यातून. अन पुढे ती सांस्कृतिक वीण अधिक घट्ट होत जाते ती श्लोक, स्त्रोत्रे आदींच्या पाठांमधून.
बदलत्या कालानुसार आपली कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, जीवनपद्धती असे सर्वच बदलत आहे आणि हे होणे साहजिकच आहे. एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य ठरत चाललेली आहे हे तर खरेच पण तिच्याबरोबरच मुलांना गाणी, गोष्टी सांगत, स्तोत्रे शिकवत, त्यांच्यावर संस्कार करणारे आजी आजोबा देखील दुर्मिळ होत जात आहेत.
 कश्यासाठी पोटासाठी याच्यापलीकडे आपण कधीच गेलो आहोत आणि दिवसाचे १६-१८ तास अर्थार्जन करणे खरेच गरजेचे झाले आहे. या दगदगीत, धावपळीत पूर्वी शिकलेली स्तोत्रे, श्लोक, परवचा, आरत्या, बालगीते, कविता, पाढे  वगैरेंची उजळणी करायला वेळ कुठे असतो? मग एखाद्या दिवशी एखादी आरती म्हणताना, स्तोत्र म्हणताना आपण अडतो अन तेव्हा लक्षात येतं, `अरे! सगळं लहानपणी शिकलेलो बरच काही आपण  विसरत चाललेलो आहोत.'
ही भावना मलादेखील नेहमी होते. असाच एकदा मायबोलीवर इथे स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह पहिला अन परत ही भावना उफाळून आली. तेव्हा मनात विचार आला, वेळ मिळेल तसतश्या शक्य तेव्हढ्या गोष्टी संकलित करून ठेवाव्यात. त्यानंतर परत विचार केला, जर हे संकलन करायचेच आहे तर ते अश्या प्रकारे करावे की जे लोकांना देखील उपलब्ध असेल आणि ज्यामध्ये इतर लोक देखील भर टाकू शकतील. म्हणून गागर में सागर भरण्याचा हा प्रयत्न.